नागपूर : आजकाल लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याच नैराश्यातून ते टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. अशीच एक घटना नागपूरमधून (Nagpur News) समोर आली आहे. यामध्ये आयएएस’ किंवा ‘आयपीएस’ अधिकारी पदाच्या परीक्षेत आलेल्या अपयशामुळे खचून गेलेल्या एका निरीक्षकाने नैराश्याच्या भरात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचललं आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत ही दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शुभम सिद्धार्थ कांबळे (25 रा. गंगाखेड, परभणी) असं मृत तरूणाचं नाव आहे. त्याला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. आई-वडील शेती करतात. अन्न तंत्रज्ञान अभ्यासक्रमात पदवीपर्यंत त्याचे शिक्षण झाले होते. शुभम हा अन्न व औषधी प्रशासन विभागात निरीक्षक पदावर कार्यरत होता. सुशिक्षित कुटुंबातील असलेल्या शुभमला ‘आयएएस’ किंवा ‘आयपीएस’ अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी त्याने तयारीही केली. मात्र, तो यशस्वी झाला नाही. हताश झाल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे.
सुसाईड नोट आली समोर
शुभमने मृत्यूपूर्वी कुटुंबीयांच्या आणि पोलिसांच्या नावे पत्र लिहिले. ‘मला आयएसएस, आयपीएस अधिकारी होता आले नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. कुटुंबातील एकाला तरी प्रशासकीय अधिकारी बनवा’, अशी इच्छा शुभमने व्यक्त केली आहे. तसेच आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक
Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल
Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी
Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?
Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा
Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?