Datta Dalvi

Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?

418 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi ) यांना अटक करण्यात आली आहे. विक्रोळीतील राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली आहे.भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चला तर मग आज आपण हे दत्ता दळवी नेमके कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊयात…

कोण आहेत दत्ता दळवी?
साधा शिवसैनिक ते महापौर असा दत्ता दळवी यांचा प्रवास राहिला आहे. दत्ता दळवी 2005 ते 2007 या कालावधीत मुंबईचे महापौर होते. महापौर म्हणून दत्ता दळवी यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. शिवसेनेचे धाडसी आणि आक्रमक नेते म्हणून दळवी यांची ओळख आहे. ईशान्य मुंबईमध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे. शिवसेनेत विभाग क्रमांक 7 चे विभागप्रमुख म्हणून त्यांनी पद भूषविले आहे. ते शिवसेनेचे उपेनेतेही होते. 2018मध्ये शिवसेनेच्या ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांनी गटबाजी केल्यामुळे दळवी यांनी ईशान्य मुंबईच्या तत्कालीन विभाग क्रमांक 7 च्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केला होता. यानंतर ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते.

एप्रिल 2022मध्ये मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी तलावाजवळ बैल झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. या प्रकरणात एका बैलाच्या मृत्यूस आणि अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील 12 मुख्य संशयितांसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये दत्ता दळवी यांचाही समावेश होता. आज दत्ता दळवी यांना मुलुंड कोर्टात हजर करण्यात आले. यामध्ये कोर्टाने त्यांना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मी कोणतीही शिवीगाळ केलेली नाही. माझ्या वक्त्याववर मी ठाम आहे अशी प्रतिक्रया दत्ता दळवी यांनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur News : सोलापूर हादरलं ! पत्नी आणि मुलाची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Share This News

Related Post

Sudhir More

Sudhir More : मुंबई हादरली ! उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक सुधीर मोरेंची धावत्या लोकलखाली आत्महत्या

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला.…
Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रो स्टेशनच्या बांधकामादरम्यान लोखंडी भाग कारच्या बोनेटवर पडून भीषण अपघात

Posted by - August 11, 2023 0
पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) स्टेशनचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना काल येरवडा या ठिकाणी एक भीषण दुर्घटना घडली…
Tiger

Chandrapur Tiger : जागतिक व्याघ्र दिनाच्या दिवशीच चंद्रपुरात वाघिणीचा मृत्यू

Posted by - July 29, 2023 0
चंद्रपूर : जागतिक व्याघ्र दिनाच्या दिवशीच चंद्रपूरमध्ये (Chandrapur Tiger) एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका वाघिणीचा…
Mantralaya

15 ऑगस्टपूर्वी 75 हजार पदांची होणार मेघाभरती

Posted by - May 15, 2023 0
सोलापूर : राज्य शासनाच्या 43 विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त स्वरूपात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी…

पुण्याच्या राजकारणातील संयमी व्यक्तिमत्त्व ‘अनिल शिरोळे’…

Posted by - September 13, 2022 0
पुणे : पद्माकर गुलाबराव शिरोळे उर्फ अनिल शिरोळे पुणे शहराच्या राजकारणातील एक सभ्य सुसंस्कृत आणि चारित्र्यवान नेता… 2019 मध्ये अनिल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *