ठाणे : मिरारोडच्या सरस्वती वैद्य प्रकरणात (Mira Road Murder Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील रासायनिक पृथक्करण अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला. यात सरस्वतीने कीटकनाशक प्राशन केले होते की नाही हे कळू शकलेले नाही. मृतदेह शिजवण्यात आल्याने व इतर कारणास्तव चाचणीत स्पष्ट काहीच कळू शकलेले नाही. त्यामुळे आरोपीच्या दाव्यानुसार सरस्वतीने स्वतःहून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याचे गूढ अद्याप कायम आहे.
काय आहे नेमके सरस्वती वैद्य हत्याकांड ?
मिरारोडच्या गीतानगरमध्ये राहणाऱ्या आरोपी मनोज साने याने लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची निर्घृणपणे हत्या केली होती. यानंतर आरोपीने सरस्वतीची हत्या (Mira Road Murder Case)केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि फेकून देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा आणि 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
हत्या करण्यापूर्वी मनोज सानेने बोरीवलीच्या आदर्श स्टोअर्स या नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दुपारी पोलिसांनी आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेलं होतं. तिथे केलेल्या चौकशीत साने यानेच किटकनाशक खरेदी केल्याचं उघड झाले होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…
Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन
Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक
Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या
Chhagan Bhujbal : ‘या’ ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर; चर्चांना उधाण
Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट
Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
Firing In Parbhani : खळबळजनक ! पूर्णा कॉलेज कॅम्पसमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या; परभणी हादरलं