इंदापूर : सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नवाब मलिक यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून वाद पेटलेला असताना इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाने मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लागले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे.
शनिवारी 9 डिसेंबर रोजी इंदापुरात ओबीसी एल्गार मेळावा होणार असून या सभेला ओबीसीचे नेते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहेत. सभेची तयारी पूर्ण झाली असून इंदापूर तालुक्यात भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ असे बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत. ओबीसी समाजातील अनेक नेते या एल्गार सभेमध्ये मार्गदर्शन करणारा असून या सभेकडे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा म्हणून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
आजपर्यंत अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले होते. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे सुद्धा भावी मुख्यमंत्री बॅनर पाहण्यास मिळाले आहे. आता अशातच छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…
Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन
Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक
Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या