नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेच्या एथिक्स पॅनलने कॅश फॉर क्वेरी प्रकरणात (संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या आरोपात) दोषी ठरवले होते. याबरोबरच खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती. या शिफारशीनुसार त्यांची ही खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांकडून घेण्यात आला.
महुआ मोईत्रा यांनी काय म्हटलं?
खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी म्हटलं की, मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे माझं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. एथिक्स कमिटीसमोर माझ्याविरुद्ध कोणताही मुद्दा नव्हता, कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता.
काय आहे कॅश फॉर क्वेरी प्रकरण ?
कॅश फॉर क्वेरी प्रकरणात मोईत्रा चांगल्याच अडकल्या आहेत. पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्या प्रकरणी मोईत्रांवर ठपका ठेवण्यात आला होता. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रांवर उदयोजकांकडून पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. त्या प्रकरणी नेमलेल्या एथिक्स कमिटीनं त्यांना दोषी ठरवत, त्यांच्या निलंबनाची शिफारस केली होती. एथिक्स कमिटीचा हा अहवाल स्वीकारुन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…
Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन
Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक
Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या
Chhagan Bhujbal : ‘या’ ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर; चर्चांना उधाण