Accident News

Accident News : छ. संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

617 0

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची (Accident News) बातमी उघडकीस आली आहे. यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती जमिनीवर कोसळली आणि दुचाकीच्या मागून येणाऱ्या एक ट्रॅक्टरने तिला चिरडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे. हर्सूल -सावंगी रस्त्यावर हा अपघात घडला. मृत महिलेचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नेमके काय घडले?
ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्हयातल्या हर्सूल सावंगी येथे घडली असून दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही महिला खाली कोसळली आणि त्याचवेळी दुचाकीच्या पाठिमागून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने महिलेला चिरडले. या घटनेमुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही घटना हर्सूल पोलीस स्टेशन समोरच घडल्यामुळे तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, महिलेचे नाव अद्याप स्पष्ट नसल्याने घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात उष्णतेचा कहर;स्विफ्ट कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक

Sonal Gondane : वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तरमधून सोनल गोंदाने यांना उमेदवारी जाहीर

Shantigiti Maharaj : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी ‘या’ पक्षाकडून भरला उमेदवारी अर्ज

Srinivasa Prasad : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व्ही.श्रीनिवास प्रसाद यांचे निधन

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार

Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!