अहमदनगर : अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची (Ahmednagar Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात काल रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या तीन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
विजय गंगाधर गव्हाणे, पंकज सुरेश तांबे, मयूर संतोष कोळी, अशी मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत. सचिन दिलीप गीते, अमोल बबन डोंगरे अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले तरुण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, MIDC, नगर येथील रहिवासी आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या
Suresh Gopi : मोदी सरकारला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर
Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज