Noor Malabika Death

Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

407 0

मुंबई : बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये अभिनेत्री नूर मालाबिका दासने (Noor Malabika Death) आत्महत्या केली आहे. ‘द ट्रायल’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना 6 जून रोजी लोखंडवाला स्थित असलेल्या फ्लॅटमध्ये ती मृताअवस्थेत सापडली. तिने घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. 37 वर्षांच्या अभिनेत्रीच्या आत्महत्येनं इंडस्ट्रीत चांगलीच खळबळ उडाली आहे. तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

शेजाऱ्यांना अभिनेत्रीच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यानं त्यांनी तात्काळ त्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अभिनेत्री तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह सडला होता. मुंबईतील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ममदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट NGOनं अभिनेत्रीवर रविवारी अंत्यसंस्कार केले.

नूर मालाबिका कोण आहे?
नूर मालाबिका ही आसामची राहणारी आहे. त्याशिवाय तिनं हिंदी चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. त्यात ‘सिसकियां’, ‘, ‘वॉकमैन’, ‘तीखी चटनी’, ‘जघन्या उपाय’, ‘चरमसुख’, ‘देखी अनदेखी’, ‘बॅकरोड हलचल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर त्याशिवाय तिनं डिज्नी प्लस हॉटस्टार प्रदर्शित झालेल्या ‘द ट्रायल’ मध्ये दिसली होती. त्या सीरिजमध्ये ती काजोल आणि जीशु सेनगुप्तासोहत दिसली होती. नूर मालाबिका ही आसामच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते होते. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नूर मालाबिकाचे 163K फॉलोवर्स आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Suresh Gopi : मोदी सरकारला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

Share This News

Related Post

Jalna Suicide

‘तू मला अजिबात आवडत नाही’; पतीचे हे वाक्य जिव्हारी लागल्याने विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - June 14, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका 19 वर्षीय विवाहितेने राहत्या…
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : बॉलीवूड अभिनेते शाहरुख खानची अचानक तब्येत बिघडली

Posted by - May 22, 2024 0
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला (Shah Rukh Khan) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अहमदाबादमध्ये असलेल्या केडी रुग्णालयात दाखल…
Telgi Scam

Telgi Scam : छगन भुजबळांनी उल्लेख केलेला अब्दुल करीम तेलगी कोण आहे? आणि काय होता स्टॅम्प पेपर घोटाळा?

Posted by - August 28, 2023 0
मुंबई : रविवारी बीडमध्ये अजित पवार गटाची सभा पार पडली. या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर…
Jaya Prada

Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदांच्या अडचणीत वाढ! ‘या’ तारखेला न्यायालयात हजर करण्याचे दिले आदेश

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जयाप्रदा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *