Accident Video

Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

272 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पुण्याच्या निघोजेमध्ये अज्ञात वाहनाने (Accident Video) गर्भवती महिलेला पाठीमागून जोरात धडक दिल्याने महिला जखमी झाली आहे. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. श्रद्धा सागर येळवंडे अस जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रद्धा येळवंडे या गर्भवती असून त्यांचं बाळ सुखरूप असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास देहू- निघोजे रस्त्यावर बालिंगवस्ती या ठिकाणी जखमी श्रद्धा येळवंडे या रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने चालत जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगातील स्विफ्ट गाडी नंबर (एम.एच 14 एच. के.0529 ) ने पाठीमागून जोरात धडक दिली. यात श्रद्धा येळवंडे जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

या अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलीस या चालकाचा शोध घेत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

Share This News

Related Post

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati

Pune News : ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक

Posted by - September 27, 2023 0
पुणे : ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक उद्या (गुरुवार) सायंकाळी 7 वाजता निघणार आहे. त्यासाठी यंदा आकर्षक…
Rangari Ganpati

Pune News : संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला केली मोगर्‍यांची आरास

Posted by - May 27, 2024 0
पुणे : संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला (Pune News) वासंतिक उटी व मोगरा मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.…
Sindhudurg Crime

Sindhudurg Crime : पतीचा 4 दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून; आज पत्नीची गळफास घेत आत्महत्या,पोलिसांसमोरचा गुंता वाढला

Posted by - September 22, 2023 0
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सिंधुदुर्गातल्या देवगड तालुक्यातील मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके…

अरर…! विचित्र अपघात , पहिल्या अपघातातून वाचला आणि लगेचच दुसरा अपघात , व्हिडिओ व्हायरल

Posted by - August 20, 2022 0
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही अपघाताचे व्हिडिओ हे पाहून भीतीही वाटते पण काही व्हिडिओ पाहून अपघातग्रस्त…
Cauhan Death

खळबळजनक ! वाळू माफियांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली चिरडलं

Posted by - June 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये राज्यातील कलबुर्गी या ठिकाणी गुरूवारी सायंकाळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *