Vishal Agrawal

Vishal Agarwal : विशाल अगरवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

496 0

पुणे : कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. यादरम्यान आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालला यांच्यावर सुनावणी पार पडली.

काय घडले सुनावणीमध्ये?
या सुनावणीमध्ये विशाल अगरवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 3 दिवसांची पोलीस कोठडी असणार आहे. अगरवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा कोर्टाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

‘त्या’ रात्री काय घडले होते ?
पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ज्या पोर्शे कारने दोघांना धडक दिली ती कार विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता.या अपघातानंतर आरोपी मुलाला जमावाने बेदम चोप दिला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन सुट्टीच्या न्यायालयात हजर केले. न्यायलयाने त्याला अटी व शर्तींवर लगेच जामीन मंजूर केला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका अ‍ॅक्शन मोडवर; ‘या’ 2 पबवर केली कारवाई

Pune Porsche Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?

Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!