praniti shinde

Praniti Shinde : पुलवामा हल्ल्या संदर्भातील ‘ते’ वक्तव्य प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली दखल

1175 0

सोलापूर : सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या कन्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपने निवडणूक आयुक्तांकडे प्रणिती शिंदेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. प्रणिती शिंदेंनी जाहीर भाषणामध्ये केलेल्या एका वक्तव्यावविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रणिती शिंदेने काय केले होते वक्तव्य?
प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाल्या, “जेव्हा त्यांना कळत की आपली बाजू झुकत आहे, त्यावेळी ते जातीमध्ये तेढ निर्माण करतात. सावध राहा. मागच्यावेळेसही पुलवामा हल्ला घडवून आणला. त्यांचे अधिकारीच म्हणाले की पुलवामा दहशतवादी हल्ला घडला नाहीतर घडवून आणला आहे. पण कसे घडवले, आपल्या जवानांच्या रक्तातून…वा…विरोधक एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतात. यातूनच त्यांची मानसिकता कळते.” असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केले होते.

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात होणार लढत
सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, भाजपने माळशिरसचे विद्ममान आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवले आहे. सोलापूरची जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी

Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी

Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!