रत्नागिरी : रत्नागिरीमधून (Ratnagiri News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रत्नागिरीतील मंडणगड शहरात ट्रॅक्टरमध्ये तब्बल 153 जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करून एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
रत्नागिरीतील मंडणगड शहरात एका ट्रॅक्टरमध्ये जिलेटिनचा मोठा साठा आढळून आला आहे. जिलेटिनच्या तब्बल 153 कांड्या सापडल्या आहेत. या प्रकरामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटकसुद्धा केली आहे. या व्यक्तीकडून तब्बल चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रतनलाल बाळू रामजी मूळ राहणार चित्तोडगढ राजस्थान येथील व्यक्तीला पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. स्फोटक पदार्थ बाळगल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे रत्नागिरीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स
Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद
Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का
Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड
ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात
PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास
Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू
RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार
Nashik News : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात