Team Of Tournament

World Cup 2023 : ICC कडून वनडे वर्ल्ड कप 2023 च्या टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा

731 0

मुंबई : नुकताच वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) पार पडला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत 6 व्यांदा विश्वचषक जिंकला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाचे विश्वचषक जिकंण्याचे स्वप्न भंगले आहे. ऑस्ट्रेलिया विश्वविजेता ठरल्यानंतर आता आयसीसीने टीम ऑफ टुर्नामेंटची घोषणा केली आहे. आयसीसीकडून याची माहिती देण्यात आली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या टीम ऑफ टुर्नामेंटमध्ये एकूण 12 खेळाडूंचा समावेश आहे. या 12 पैकी 6 भारतीय खेळाडू आहेत. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी 2 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या 1-1 खेळाडूला या टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 टीम ऑफ टुर्नामेंट
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ग्लेन मॅक्सवेल, एडम झॅम्पा, क्विंटन डी कॉक, गेराल्ड कोएत्झी, डॅरेल मिचेल आणि दिलशान मधुशंका.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Share This News
error: Content is protected !!