आता कैद्यांनाही मिळणार कर्ज, येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्वावर योजना राबवणार

107 0

मुंबई- कारागृहातील शिक्षाधीन बंदी यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज 7 टक्के इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

कारागृहातील बंद्यांच्या जीवनमानात सुधारणा व त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने गरजेकरता त्यांना कुटुंबीयांसाठी कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. देशामध्ये अशाप्रकारच्या खावटी कर्जाची ही नाविन्यपूर्ण योजना म्हणून पहिलीच योजना असणार आहे. कारागृहामध्ये अनेक बंदी दीर्घमुदतीची शिक्षा भोगत असतात. यातील बहुसंख्य बंदी हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असल्याने अशा बंद्यांना दीर्घकाळ तुरूंगात रहावे लागल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब हवालदिल होऊन कुटुंबीयांमध्ये औदासिन्य, नैराश्य, अपराधीपणाची जाणीव निर्माण होऊ शकते.

अशा परिस्थितीत कैद्यास त्याच्या कुटुंबाच्या गरजेकरिता कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून दिल्यास कैद्याबद्दल कुटुंबीयांमध्ये सहानुभूती व प्रेम वाढून कुटुंबातील वातावरण सुदृढ राहण्यास मदत होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

कैद्याची कर्ज मर्यादा, शिक्षेचा कालावधी, त्यामधून त्याला मिळू शकणारी संभाव्य सूट, वय, वार्षिक कामाचे अंदाजित दिवस, प्रति दिवसाचे किमान उत्पन्न यानुसार प्रस्तुत कर्जसुविधा ठरविली जाईल. अशा प्रकारच्या कर्जाला जामीनदारांची आवश्यकता असणार नाही. हे कर्ज संबंधित बंद्याला विनातारण व केवळ व्यक्तीगत हमीवर देण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा

Posted by - August 20, 2022 0
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा…

#दुर्दैवी : संसार आत्ताच सुरू झाला होता; टेरेसवर नवऱ्याशी गप्पा मारताना अचानक तोल गेला आणि…

Posted by - March 24, 2023 0
चेन्नई : चेन्नईमध्ये एक मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर टेरेसवर फेरफटका मारण्यासाठी हे दांपत्य गेले…

PHOTO OF THE DAY : देव तेथेचि जाणावा ! बाप्पाच्या आगमनाच्या पावन दिवशी नितेश राणेंनी पोस्ट केलेल्या आजींच्या फोटोची चर्चा…

Posted by - August 31, 2022 0
आज घरोघरी थाटामाटात बुद्धीच्या देवतेचं आगमन होते आहे . बाप्पा घरामध्ये विराजमान झाले कि संपूर्ण घरात जसे नवचैतन्य निर्माण होते…
Shakuni Mama

महाभारतातील शकुनी मामा म्हणजेच गूफी पेंटल यांचे निधन

Posted by - June 5, 2023 0
मुंबई : काल रात्री ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून…

मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला सक्तमजुरी, तीन वर्षानंतर लागला निकाल

Posted by - March 12, 2022 0
पुणे- एका नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करीत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *