एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार ? सुनबाईंना घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये दाखल ,खा. रक्षा खडसे म्हणाल्या …

442 0

एकनाथ खडसे आणि अमित शहा यांच्या भेटी मागचे गुड वाढले आहे. एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना एकीकडे ऊत आला आहे.

दरम्यान मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका जाहीर सभेमध्ये एकनाथ खडसे यांनी अमित शहा यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली असल्याचा दावा केला होता. यावरून चर्चेला उधळ आले होते. दरम्यान आता “दिल्लीत अमित शहा यांची भेट झाली नाही, पण एकनाथ खडसे यांची फोनवरून अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे स्पष्टीकरण भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आज दिले आहे. तसेच लोकांना राजकारण करायचं असेल तर ते करणारच” अशी टीका देखील रक्षा खडसे यांनी केली आहे.

See the source image

दरम्यान अमित शहा यांनी खरंच सुनबाई सोबत दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली , की फोनवरून चर्चा केली हे देखील अद्याप समजू शकले नाही. आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या म्हणण्यानुसार जर फोनवरून एकनाथ खडसे आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची चर्चा झाली असेल तर नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!