गणपती झाल्यानंतर राज्यभरामध्ये पुन्हा एकदा तुफान पाऊस झाला. सध्या वातावरण मोठ्या प्रमाणावर दूषित झाले आहे. पावसामुळे आता वातावरणामध्ये गारठा देखील जाणवू लागला आहे. त्यामुळे घरोघरी सध्या सर्दी पडश्याचे पेशंट वाढत आहेत. ऋतुमान बदलामुळे येणारे हे आजारपण सामान्यच आहे. त्यामुळे तसे घाबरण्यासारखे काही नसले तरी काही टिप्स फॉलो केल्या तर यातून तुम्ही नक्कीच स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. आणि जर आजारी पडले असाल तर लवकर बरे होऊ शकता.
सर्दी पडसे म्हटले की नाक चोंदणे यामुळे रात्रीची झोप शांत लागत नाही. तर दिवसभर कामही सुचत नाही. अशावेळी घरगुती उपाय खऱ्या अर्थाने जालीम असतात.
- सर्दीने नाक चोंदणे असेल तर सकाळ-संध्याकाळ गरम पाण्याची वाफ घ्यायला विसरू नका. या पाण्यामध्ये विक्स टाकून वाफ घेतली तर आणखीन चांगला आराम मिळेल.
- रुमालावर निलगिरी टाकून त्याचा मधून अधून वास घेत रहा.
- थंडीचा त्रास होत असेल तर पायामध्ये सॉक्स घालाच आणि कान टोपी किंवा कमीत कमी कानामध्ये कापूस घालून ठेवायला विसरू नका. यामुळे सर्दी पासून तुमचे नक्की रक्षण होईल.
- तान्या बाळाला जर सर्दीचा त्रास होत असेल तर योग्य वैद्यकीय सल्ला आणि वेळच्यावेळी औषध उपचार कराच. त्यासह लहान मुलांची पाठ ,पोट आणि छाती अवश्य शेकून काढा . त्यासह कानावर आणि ताल पायावर देखील कोंबट रुमाल अवश्य लावून ठेवा.
- घरामध्ये कापूर जाळा
- घरामध्ये उब राहावी यासाठी प्रयत्न करा. यासाठी तुम्ही कोळशाच्या शेगडीचा उपयोग करू शकता. या कोळशाच्या शेगडीमध्ये ओवा टाकल्याने तो वास घरामध्ये पसरू द्या
- अन्नपदार्थ गरम करूनच खा.
- तब्येत अधिक खराब होत असेल तर वैद्यकीय सल्ला लवकर घ्या .