मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत शिंदे गट आणि ठाकरे गट पहिल्यांदाच भिडणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता दोन्हीही गटांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते आहे. रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेली अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऋतुजा लटके यांच्या राजीनामेशी आमचा काहीही संबंध नाही असे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर मुरजी पटेल यांची उमेदवारी जाहीर केली असून, ते निवडणूक अर्ज भरायला जात आहेत.
आमच्यासह अन्य भाजप नेते त्यांच्यासोबत हा फॉर्म भरायला जात असून आम्ही जिंकू असा ठाम विश्वास आहे. शिवाय 51% मतं घेऊ आणि अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.