विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला मिळाला जामीन

170 0

मुंबई- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला जामीन मिळाला असून त्याची जेलमधून सुटका झाली आहे.

हिंदुस्तानी भाऊची 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनप्रकरणी अटक झाली होती.

काय आहे प्रकरण ?

राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विनंती पत्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यासाठी जात असल्याचं भाऊन जाहीर केलं. आणि त्यासाठी त्यानं एक व्हिडीओ संदेश जारी करत तमाम मुलांनाही तिथं हजर राहण्यास सांगितलं. भाऊच्या या हाकेला प्रतिसाद देत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अचानक आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली.

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत हिंदुस्तानी भाऊला अटक केली होती. त्यांतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे जामीनाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे हिंदुस्थानी भाऊने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

Share This News

Related Post

Pune Crime

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Posted by - January 25, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे…

आज लक्ष्मीपूजन; जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचे शुभमुहूर्त

Posted by - October 24, 2022 0
आली माझ्या घरी ही दिवाळी. नरकचतुर्दशी या दीपावलीतील मुख्य सणाच्या दिवसाबरोबर आज, सोमवारी (दि.२४) लक्ष्मीपूजन हा दीपोत्सवातील उत्सव येत आहे.…

सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्याची कालमर्यादा 45 दिवसांवरून 30 दिवसांवर

Posted by - August 1, 2022 0
नवी दिल्ली : कमीतकमी वेळेत शक्य तितक्या लवकर तक्रारींचा निपटारा करून, तक्रारदाराच्या अधिकाधिक समाधानाच्या अनुषंगाने सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणेच्या प्रभावी…

महत्वाची बातमी ! धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्य सरकारने घेतला हा निर्णय

Posted by - April 18, 2022 0
मुंबई- नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई…
Rikshaw

सहकार नगरमधील मुक्तांगण शाळेशेजारी रिक्षावर झाड कोसळले; महिलेचा मृत्यू

Posted by - June 12, 2023 0
पुणे : पुण्यातील सहकार नगर, मुक्तांगण शाळेशेजारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका रिक्षावर मोठे झाड कोसळल्यामुळे एका महिलेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *