मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी (वय 81) यांचे आज निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुधीर जोशी यांना जानेवारीमध्ये कोरोनाची बाधा झाल्यामुळे मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.