थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला आग, चोरीसाठी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शक्यता

489 0

पुणे- पुण्याजवळील थेऊर इथं गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडलीये.

घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून या आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झालंय

यशवंत सहकारी सहकारी साखर कारखाना हा अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊरच्या चिंतामणी मंदिराशेजारी आहे. कारखान्यावर झालेल्या कर्जामुळे कारखाना सध्या बंद अवस्थेत एका बँकेकडे गहाण आहे. प्राथमिक माहितीनुसार कारखान्यातील साहित्य चोरण्यासाठी माथेफिरूने कारखाना पेटवून दिल्याचं समजतंय. लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कारखान्याला जाणूनबुजून आग लावल्याचा आरोप माजी संचालक पांडुरंग काळे यांनी केला आहे.

Share This News

Related Post

शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण, सासवडमधील घटना

Posted by - May 18, 2022 0
सासवड- पुरंदर तालुक्यातील यादववाडीतून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात सासवड पोलीस…

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत ३३.०९ टक्के मतदान

Posted by - April 28, 2023 0
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. दुपारपर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान…

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं निधन

Posted by - September 17, 2022 0
माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित…

वयोश्री आणि एडीप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांच्या वाटपासाठी निधी मिळावा; खासदार सुप्रिया सुळे यांची घेतली सामाजिक न्याय मंत्र्यांकडे मागणी

Posted by - December 16, 2022 0
दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली वयोश्री योजना तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या एडीप योजनेचे सर्वात चांगले काम बारामती लोकसभा मतदारसंघात झाले आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *