ऑरमॅक्स मीडियाचा साउथ स्टार्सचा मासिक अहवाल समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने पहिल्यांदाच महेश बाबूला मागे टाकले आहे. तर ज्युनियर एनटीआरनेही प्रभासची पिछेहाट केली आहे.साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने या यादीत पहिल्यांदाच टॉलिवूडचा प्रिन्स महेश बाबूला मागे टाकले आहे.
ऑरमॅक्स मीडियाच्या या ताज्या रिपोर्टमध्ये अल्लू अर्जुनने अव्वल स्थान पटकावले आहे.साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरने या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.ऑरमॅक्स मीडियाच्या या ताज्या अहवालात सुपरस्टार प्रभास तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो RRR स्टार ज्युनिअर एनटीआरच्या लोकप्रियतेच्या मागे पडला आहे. तर टॉलिवूड प्रिन्स महेश बाबूचा टॉप ३ मध्ये समावेश झाला नाही. यावेळी महेश बाबूला ऑरमॅक्सच्या मासिक रेटिंग अहवालात चौथे स्थान मिळाले आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा हा २०२१ मधील साऊथचा सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटतील लोकप्रिय गाणी असो किंवा अल्लू अर्जुनचे संवाद सिनेमातील प्रत्येक गोष्ट हिट झाली आहे. या सिनेमाच्या कथेने प्रेक्षकांना तर भुरळ घातलीच आहे. लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित ‘पुष्पा’ ने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक व्यवसाय केला. कोरोनाच्या काळात हा नवा विक्रम आहे.