त्वचेची काळजी घेण्याची खटोटोप विशेषतः थंडीच्या दिवांसामध्ये करावी लागते. हिवाळा सुरू होताच थंडीमुळे अनेक छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतात. हात आणि पायांवर रॅशेस पडणे,फुटणे ही समस्या अनेकांना जाणवते. त्वचा कोरडी पडल्यामुळे हे होत असते. चला तर मग जाणून घेऊयात थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या नेमकेपणाने करुन त्वचा टवटवीत कशी ठेवता येईल यासंदर्भातील काही खास टिप्स.
1 ) खोबऱ्याचे तेल त्वचेला लावणे खूप उपयुक्त आहे. खोबरेल तेलाचे आठ ते नऊ थेंब कोमट पाण्यात टाकावे. त्यानंतर या पाण्यात हात व पाय धुवून काढावे.
2 ) लिंबाच्या कापलेल्या एक ते दोन फोडी गरम पाण्यात टाकाव्या. त्यानेही त्वचेला आराम मिळतो.
3 ) तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात टाकावा. या पाण्यात हात आणि पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे.
4 ) एका बादलीत किंवा टबमध्ये कोमट पाणी घ्यावे व त्या पाण्यात एक ते दोन चमचे शाम्पू किंवा फेस वॉश टाकावा. त्याने दिवसभरातील त्वचेवरील धूळ निघून जाण्यास मदत होते.
5 ) लिंबाच्या सालीने हात व पाय घासावे.दहा ते पंधरा मिनिटानंतर हात पाय स्वच्छ कापडाने अथवा रुमालाने पुसून टाकावे.
6 ) हात व पायांना आवडीनुसार बॉडी लोशनचा वापर करावा. बाजारात काही आयुर्वेदिक लोशनही उपलब्ध आहेत. ते वापरण्यासही हरकत नाही
7 ) साबणाच्या वापरामुळेही त्वचा फुटण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे साबण निवडतानाही योग्य ती खबरदारी घ्यावी.
टीप : थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी कशी घ्यावी यावरील उपायासंदर्भात कोणताही उपाय करताना कृपया आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.