पुणे- शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याच्या राजकीय कटातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे स्पष्टीकरण रघुनाथ कुचिक यांनी दिली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून 24 वर्षीय महिलेवर पुणे आणि गोव्यात बलात्कार केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून कामगार क्षेत्रातील माझे काम आणि माझी अनेक वर्षे सामाजिक आणि राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं कुचिक यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आपला न्यायव्यवस्था आणि पोलिस खात्यावर पूर्ण विश्वास आहे. तपासानंतर सत्य माझ्या बाजूने येईल असा मला विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर कुचिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याच्या राजकीय कटातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार आहे आणि कामगार क्षेत्रातील माझे काम आणि माझी अनेक वर्षे सामाजिक आणि राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर आपला न्यायव्यवस्था आणि पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे. तपासानंतर सत्य माझ्या बाजूने येईल असा मला विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.