कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर पुन्हा दगडफेक; परिसरातील वातावरण तापले

279 0

कर्नाटक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात सीमा भागातील मराठी भाषकांवर कन्नडगांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा वादाबाबत ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांची कन्नडीगांकडून तोडफोड करण्यात आली होती. तर आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बसवर हल्ला करण्यात आल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत दोन्हीही राज्यांनी समोपचारने घ्यावे असा निर्वाळा अमित शहा यांनी केला होता तथापि, आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील बसवर दगडफेक कर्नाटक मध्ये करण्यात आली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!