पुणे : सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्या विरोधात कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू ओढावल्याच्या आरोपाखाली उच्च न्यायालयामध्ये शंभर कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात आला आहे. हा दावा दिलीप लूनावत यांनी केला असून, कोरोना लस घेतल्याने आपल्या मुलीवर विपरीत परिणाम झाला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. आपल्या मुलीसाठी नुकसान भरपाई आणि तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा ठपका ठेवून सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पूनावाला यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. लुनावत यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसून त्यांच्या याचिकेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी पूनावाला यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली असून कोणताही दिलासा पूनावाला यांना देण्यास नकार दिला आहे. आता या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केला आहे.