मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

269 0

मुंबई : ‘लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्ये नेतृत्व आपण आज गमावलं,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. कर्करोगाशी झुंज देत असतांनाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्य भावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्ये नेतृत्व आपण गमावले आहे. आमदार मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

नागपूर : पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलिकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती.

मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करून सुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

Share This News

Related Post

Gargi Phule

अभिनेत्री गार्गी फुलेची राजकारणात एंट्री; ‘या’ पक्षात केला प्रवेश

Posted by - May 30, 2023 0
मुंबई : अभिनयक्षेत्र आणि राजकारण यांचे फार जुने नाते आहे. अनेक अभिनेते अभिनेत्री राजकरणात प्रवेश करताना दिसतात.मागच्या काही महिन्यांपूर्वी मराठी…

#ACCIDENT : कोल्हापुरात दोन दुचाकी स्वरांची समोरासमोर धडक; दोघांचाही मृत्यू

Posted by - February 14, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की…

केतकीचा पाय आणखी खोलात ! 2020 चे अट्रोसिटी प्रकरणी केतकी रबाळे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - May 19, 2022 0
नवी मुंबई- शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढत आहेत. आता अट्रोसिटीच्या गुन्ह्यासाठी तिला…

MBA प्रवेश प्रकीया तातडीने सुरु करा ; स्टुडंट हेल्पींग हँडसची मागणी

Posted by - October 4, 2022 0
पुणे : राज्यातील एमबीए सीईटी परीक्षाचा निकाल लागुन जवळपास महिना होत आला आहे. या परीक्षेला राज्यभरातुन लाखो विद्यार्थी बसले होते.…

कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप,९ जणांची निर्दोष सुटका

Posted by - May 5, 2022 0
पुणे- उरळीकांचन येथील कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी ६ आरोपीना जिल्हा स्तर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर ९…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *