एसटी महामंडळाचे विलीनीकरण नाहीच, विलीनीकरणाचा मुद्दा राज्य सरकारने काढला निकाली

289 0

मुंबई- राज्य सरकारने एसटी विलीनीकरणाचा अहवाल मंजूर केला आहे. एसटी महामंडळ विलीनीकरण शक्य नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या एसटी विलीनीकरणाचा मुद्दा अखेरीस राज्य सरकारने निकाली काढला आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल ठेवण्यात आला होता. अहवाल सभागृहात ठेवल्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. शुक्रवारी या अहवाल संदर्भात राज्य सरकारच्या वतीने सभागृहात निवेदन करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शेकडो कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्या तरी, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी कायम आहेत. या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरू होती.

याबाबत त्रिसदस्यीय समिती देखील स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नाही, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळं संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी अखेर निराशा पडली आहे.

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News : गॅस भरताना ओमनी कारचा अचानक झाला स्फोट; चिमुकल्यांसह 10 जण जखमी

Posted by - November 18, 2023 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मारुती व्हॅन कारमध्ये गॅस भरताना आग लागल्याने मोठी…

लंपी नियंत्रणासाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक

Posted by - September 19, 2022 0
पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण…

राज्यसभेसाठी अशी होते निवडणूक, जाणून घ्या सविस्तर माहिती

Posted by - May 27, 2022 0
नवी दिल्ली – महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी 10 जूनला मतदान होत आहे. ही निवडणूक प्रक्रिया कशी होते याची उत्सुकता…

इंधन दरवाढीमुळे पीएमपीच्या तिकिटात वाढ होण्याची शक्यता

Posted by - March 24, 2022 0
पुणे- इंधनाच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या डिझेल…

#AJIT PAWAR : रखरखत्या उन्हात 20 हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर; आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत

Posted by - March 14, 2023 0
मुंबई : वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *