BIG BREAKING : पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक; महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्याचे पडसाद

781 0

पिंपरी : पिंपरीतून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. पैठणमध्ये एका सभेमध्ये पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या अपमानजनक विधानामुळे आज पुण्यामध्ये तीव्र निदर्शने केली जात आहेत असे असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला उपस्थित होते. या ठिकाणी एका कार्यकर्त्याच्या घरी भेट देऊन चंद्रकांत पाटील निघाले असता त्यांच्या अंगावर शाही फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावरून समता परिषद आक्रमक झाली असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली असून देखील हा वाद शमण्याचं चिन्ह दिसत नाहीये. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाही फेक झाल्यानंतर परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतला आहे. घटनेची माहिती कळताच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!