शाई फेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, “हिम्मत असेल तर समोर या, मी कुणाला घाबरत नाही ! वाचा सविस्तर

443 0

पिंपरी : पिंपरीमध्ये आज समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. महापुरुषांवरील अपमान जनक वक्तव्याचे पडसाद आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आले होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाही फेक झाल्यानंतर पिंपरीतील वातावरण तणावाचे झाले आहे.

या घटनेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, “मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सगळे कार्यक्रम करणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणे त्याचं तीन-तीन वेळा स्पष्टीकरण दिल्यानंतरही…, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हा भ्याडपणा ! अरे हिम्मत असेल तर समोर या, चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करू असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

BIG BREAKING : पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेक; महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्याचे पडसाद

अरे काय चाललंय ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात जे जपलं की एखाद्या गोष्टीचा विरोध हा लोकशाही मार्गाने करायचा, पण ही झुंडशाही आहे ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही, या शाही फेकीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील. पण झुंडशाही चालणार नाही. आज समजा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छूट दिली असती तर हे केवढ्यात पडलं असतं. पण आम्ही आमची संस्कृती सोडणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Share This News

Related Post

PUNE POLICE TRANSFERS : पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Posted by - September 15, 2022 0
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आले आहेत. अंतर्गत बदल्यांचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना दिल्या होळी, धुलीवंदनाच्या शुभेच्छा

Posted by - March 18, 2022 0
देशभरात रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज धुलिवंदनानिमित्त लोक रंगात रंगलेले दिसत आहेत. लोक वेगवेगळ्या शैली आणि…

भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवू शकतो आणि जिंकू शकतो, चंद्रकांत पाटील यांचा आत्मविश्वास

Posted by - May 26, 2022 0
मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकलही, असा आत्मविश्वास भाजप…
Police

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Posted by - April 11, 2024 0
मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी 15 एप्रिल ते 2…
Yerwada Jail

Yerawada Jail : येरवाडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Posted by - June 20, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune) येरवाडा कारागृहामधून (Yerawada Jail) एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवाडा कारागृहात (Yerawada Jail) दोन गटात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *