पुणे : चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करून अडचणीत आलेल्या चंद्रकांत पाटलांच्या कोथरूड मतदारसंघात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं.चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आंदोलन केल आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्यांची वाचाळ वीर आणि नालायक मंत्री म्हणून नोंद होईल ते चंद्रकांत पाटील आहेत. अशी जरी टीका प्रशांत जगताप यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आणि भाजपने संपूर्ण राज्याची माफी मागावी अशी देखील भूमिका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली आहे