‘गुढीपाडवा जल्लोषात साजरा करणारच’, राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

160 0

मुंबई- येत्या शनिवारी २ एप्रिल रोजी राज्यात गुढीपाडवा साजरा होणार आहे. मात्र ठाकरे सरकार या सणासाठी निर्बंध घालण्याचा विचार करतय. त्यावर भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये ‘तुमचे निर्बंध घाला चुलीत! हिंदू सणांवर बंधनं लादू नका’ असे म्हटले आहे.

राम कदमांनी पत्रात म्हटलं आहे की, आपल्या सरकारने पुन्हा एकदा हिंदूंचा अत्यंत महत्वाचा सण गुढीपाडवा आणि राम नवमी यावर निर्बंध घालण्याचा मानस नुकताच जाहीर केलाय. असे जाचक निर्बंध हिंदू सणांवर आपल सरकार का घालतंय? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा आपल्या सरकारला सवाल आहे. कोरोनाच्या संकट काळातून सावरत असताना आता कुठे गाडी रुळावर आलीय. लोक त्या भीतीच्या वातावरणातून मुक्त होऊन पारंपरिक पद्धतीनं आपले सण साजरे करत आहेत. लोकांना मुक्तपणे त्यांचे सण साजरे करू द्यावेत.

‘आपलं जीवनमान सुरळीत जगण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते प्रत्येकाला व्यवस्थित माहित आहे. पण सरकारने हे करा, हे नका करू.. असं सांगण्यापेक्षा लोकांना मुक्तपणे त्यांचे सण साजरे करू द्यावेत. आम्हाला आमच्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते व्यवस्थित ठाऊक आहे. होळीच्या वेळेस देखील आपल्या सरकारनं शिमगा साजरा करायचा नाही म्हणत निर्बंध घातले. पोलीस केस करू अशा धमक्या दिल्या. काय झालं ?सरकारला आमच्या विरोधासमोर सगळे निर्बंध मागे घ्यावे लागले.

कदम यांनी म्हटले आहे की, सरकारमध्ये अशा कोणत्या शक्ती आहेत कि ज्या हिंदू विरोधी काम करत आहेत. त्यांना हिंदूंचे सण बघवत नाहीत. हिंदू सण आले की त्यांना निर्बंध आठवतात. हे असे हिंदू विरोधी महाराष्ट्राच्या भूमीत ठेचून काढावेच लागतील. आपल्या सरकारला गुढी पाडवा आणि राम नवमी याच्यावर निर्बंध घालता येणार नाहीत. जर चुकून घातले गेलेत तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला म्हणावे लागेल की तुमचे निर्बंध गेले चुलीत’

आम्ही आमचा गुढीपाडवा व राम नवमी आणि येणारे सर्व हिंदू सण थाटात जल्लोषात ढोल ताश्या सहित साजरे करणारच. राज्याचे प्रमुख म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे. अशा प्रकारचे कोणतेही हिंदू सणांवरील निर्बंध आपण आणि आपल्या सरकारने घालू नये, असं राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.

Share This News

Related Post

Sharad Pawar

Ajit Pawar : ‘अजित पवार आमचेच नेते’ शरद पवार यांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Posted by - August 25, 2023 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमधून बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल

Posted by - June 28, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने…

‘स्त्रीभ्रूण हत्त्यांचा जिल्हा’ अशी ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात एका दाम्पत्याकडून मुलीच्या जन्माचं स्वागत

Posted by - November 18, 2022 0
बीड : जो बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी बदनाम झाला होता. त्याच बीड जिल्ह्यात एका दाम्पत्यांनं कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून तिचं…

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Posted by - October 4, 2022 0
शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर व तेल केवळ शंभर रुपयांत देणार. आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पाच्या…

MAHARASHTRA POLITICS : काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर ? फडणवीस-चव्हाणांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही भेट 15…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *