हिंजवडीमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला मुलीचा मृतदेह (व्हिडिओ)

503 0

पिंपरी- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क जवळ मुळा नदी शेजारी अतिशय निर्जनस्थळी एका झाडावर एका मुलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मारेकऱ्याने मुलीचा खून करून तिचा मृतदेह झाडाला लटकावला असल्याचे प्राथमिक तपासून समोर आले आहे. या मुलीची अद्याप ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माण गावाच्या डोंगराळ भागात सहसा कोणीही फिरकत नाही. मात्र, बुधवारी तरुणांच्या टोळके या ठिकाणी आले त्यावेळी त्यांना झाडावर मृतदेह लटकलेला असल्याचे आढळून आले. त्यांनी ही माहिती पोलिसांनी दिली. माहिती कळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मुलीचा खून चार ते पाच आठवड्यापूर्वी करण्यात आला असावा. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी मृतदेह डीएनए चाचणी आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले की, बेपत्ता लोकांची माहिती घेण्याचे काम सुरु असून त्यातून या मुलीची ओळख पटू शकते. आपल्या भागात कुणी मुलगी बेपत्ता असल्यास नातेवाइकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.

Share This News

Related Post

दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूयात ‘नारळाचा चव आणि खव्यापासून सुरेख करंज्यांची रेसिपी

Posted by - October 13, 2022 0
दिवाळी फराळाला सुरुवात केलीत का? अनेक गृहिणींनी सामानाची जमवाजमा करायला सुरुवात नक्कीच केली असणार आहे. चला तर मग आज पाहूयात…

महाराष्ट्रातील 70 वर्षांपूर्वीचा खटला न्यायालयात आजतागायत प्रलंबित; आरोपी आता जिवंत आहे की नाही त्याचाही नाही उल्लेख ! नेमका खटला काय आहे ?

Posted by - January 11, 2023 0
न्यायदानाला विलंब म्हणजे अन्याय असं म्हंटल जातं. पण असं असलं तरी देशातील विविध न्यायालयात कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत. देशातील सर्वात…

नागपुर रेल्वे स्थानक परिसरात स्फोटकाची बॅग, बॅगमध्ये 54 जिलेटिनच्या कांड्या

Posted by - May 10, 2022 0
नागपूर- येथील रेल्वे स्थानक परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात जिवंत स्फोटके असलेली बेवारस बॅग सापडली आहे.…

नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीवर दाट धुके; मतदारांचा सकाळच्या वेळेत अल्प प्रतिसाद

Posted by - January 30, 2023 0
नाशिक : आज नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघासाठी २९ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते आहे. दरम्यान वातावरणातील गारवा पाहता मोठ्या प्रमाणावर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन; सामाजिक न्याय दिन, विविध उपक्रमांना दिल्या शुभेच्छा

Posted by - June 26, 2022 0
मुंबई:- सामाजिक समतेचे अग्रदूत, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *