पुण्यातील पाणीप्रश्नी गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

97 0

पुणे- पुणे शहरातील पाणीप्रश्नावर खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर अंकुश काकडे, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, शशिकांत जगताप, आसिफ शेख, गणेश नलावडे, सचिन शेलार, वनीता जगताप, नीता गलांडे, युसुफ शेख, संजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी खासदार बापट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “अहो बापट, काय हे नाटक? सत्तेचे अपयश लपवण्यासाठी कसली ही आदळआपट” “गिरीश बापट जवाब दो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ” “पुणे शहरात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षात शहरातील पाणीपुरवठ्याचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करता आले नाही. संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येणे, दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद असणे,पाणी न येणे असे प्रकार वारंवार घडत असून हे महापालिकेतील गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी भाजपचे अपयश आहे. पुणेकरांच्या या मनस्तापाला केवळ भाजप जबाबदार आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी 24×7 पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगत भाजप सत्तेत आली. आज प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की २४ तास तर सोडा हक्काचे १ तास सुध्दा पाणी मिळत नाही”

Share This News

Related Post

पीएमपीच्या नवीन चार मार्गांचे उदघाटन

Posted by - March 14, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पीएमपीच्या चार नवीन बस मार्गांचे उद्घाटन झाले. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. सध्या…
Manisha Kayande

Manisha Kaynade : ठाकरे गटाला मोठा धक्का ! आमदार मनिषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश?

Posted by - June 18, 2023 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kaynade) या आता…
Nana Patole

Leader of the Opposition : ‘या’ कारणामुळे विरोधीपक्ष नेत्याच्या निवडीला विलंब; नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया

Posted by - July 22, 2023 0
नागपूर : राज्यात पावसाळी अधिवेशनला सुरू होऊन जवळपास एक आठवडा उलटला आहे. तरीदेखील अजूनपर्यंत विरोधी पक्षनेत्याची निवड (Leader of the…

घरगुती गॅसचे दर वाढताच रूपाली पाटील ट्विट करून म्हणाल्या… BJPहटाओ देश बचाओ

Posted by - May 7, 2022 0
पुणे- एकीकडे दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात आज पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या दरामध्ये 50 रुपयांची…
PMPL

पुणे पीएमपीच्या ताफ्यात नव्या 900 इलेक्ट्रिक बस येणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

Posted by - June 15, 2023 0
पुणे : येत्या काळात पीएमपीच्या (PMP) ताफ्यात 900 इलेक्ट्रिक बस (Electric Bus) दाखल होणार आहेत. यामध्ये 600 बस केंद्र शासनाकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *