बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. तर त्यानंतर दहावीची परीक्षा (SSC Exam) 15 मार्चपासून पार पडणार आहे. दरम्यान दहावी परीक्षेसाठी हॉल तिकीट 18 फेब्रुवारीला दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.
दहावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट http://www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान ऑनलाइन हॉल तिकीट शाळेकडून प्रिंट करून आणि मुख्याध्यापकांची सही, शिक्का मारून विद्यार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.
कसं कराल डाऊनलोड?
सर्वात आधी तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट ब्राऊजरमधून http://www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर जा.
त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करु शकता.