शिवसेनेचे रघुनाथ कुचिक यांची ‘ती’ टेस्ट खोटी, पीडित तरुणीचा आरोप

232 0

पुणे- शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. या प्रकरणी कुचिक यांच्या विरोधात गुन्हा देखील झाला आहे.
त्यानंतर कुचिक यांनी आपण वडील होऊ शकत नसल्याचं वैद्यकीय चाचणीतून सिद्ध झाल्याचा दावा केला होता. मात्र रघुनाथ कुचिक यांनी केलेली ही टेस्ट खोटी असून माझं गर्भपात झालेलं बाळ त्यांचचं होतं असा आरोप देखील पीडीतेने केला आहे.

संबंधित पिडीतेने आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याबाबत बोलताना पीडित तरुणीने म्हटले आहे की, रघुनाथ कुचीक प्रत्येक गोष्ट खोटं बोलत आहेत, आतापर्यंत मी गप्प होते कारण माझ्याकडे माझ्या डीएनए चाचणीचा रिपोर्ट नव्हता, पण आता तो आला आहे. आता रघुनाथ कुचिक यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट करावी अशी मागणी पीडितेने केली आहे.

रघुनाथ कुचिक नेहमी मला मेसेज करायचे, आणि आता ते म्हणतात की माझा नंबर मॉर्फ करून वापरला गेला, मात्र तसं नसून मी त्या नंबरची फॉरेन्सिक टेस्ट केली आहे आणि ती टेस्ट सरकारी असते. ज्या फोरेन्सिक टेस्टमधून सगळे काही उघड झाल असून आता ती फॉरेन्सिक रिपोर्ट देखील मी कोर्टात देणार असल्याचं तरुणीने सांगितले आहे त्याचबरोबर कुचिक काही बेकायदेशीर धंदे करत असल्याचे पुरावे देखील मी कोर्टात देणार असल्याचं त्या पिडीतेने सांगितले.

‘मी मदतीसाठी आत्तापर्यंत शिवसेना नेते संजय राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांना देखील मी १० वेळेस कॉल केला पण त्यांनी उत्तर दिले नाही अशी माहिती पीडित तरुणीने दिली. या सगळ्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचीक यांच्या मुलीने आरोप करत असलेल्या तरुणीची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगेचच ती मागणी मान्य देखील केली आहे. आता त्यावर विचार होत असल्याचं सांगितलं जात आहे.

Share This News

Related Post

गाढविणीच्या दुधाने स्त्रीचे सौंदर्य खुलते…. मनेका गांधी यांचा दावा… पाहा व्हिडिओ

Posted by - April 3, 2023 0
गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या साबणामुळे स्त्रीचे सौंदर्य अबाधित राहते असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि सुल्तानपूरच्या खासदार मनेका गांधी…

बावधनमध्ये सिमेंट पोत्यात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले

Posted by - April 20, 2022 0
पिंपरी- हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथील नाल्यात सिमेंट पोत्यात भरलेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाचे…
Samriddhi Highway Accident

Samruddhi Highway : मोठी बातमी! समृद्धी महामार्ग अपघाताप्रकरणी दोन RTO अधिकाऱ्यांना अटक

Posted by - October 16, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : रविवारी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस…
Jalgaon

काम आटोपून घरी परतताना बांधकाम कामागाराचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 2, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काम आटोपून घराकडे परतणाऱ्या एका बांधकाम कामागाराचा रेल्वे रुळ ओलांडतांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *