Breaking ! नाशिकच्या सिक्युरिटी नोट प्रेसच्या आवारात आग

124 0

नाशिक- चलनी नोटांची निर्मिती करणाऱ्या नाशिकच्या सिक्युरिटी नोट प्रेसच्या आवारात अचानक मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. नोट प्रेसच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाच्या परिसरात गवताला आग लागली. अग्निशमन दलाकडून ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नोट प्रेसच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाच्या परिसरात गवताला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. सुरुवातीला जिथे आग लागली होती तिथे मोठ्या प्रमाणात गवत, कचरा होता. सध्या उन्हाची तीव्रता वाढलीय. यामुळेही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काय आहे या प्रेसचा इतिहास ?

नाशिकमध्ये सिक्युरिटी नोट प्रेसची स्थापना 1924 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. 1928 मध्ये पहिल्यांदा 5 रुपयांची नोट या नोट प्रेसमध्ये छापण्यात आली. 1980 पर्यंत सिक्युरिटी प्रेसमध्येच नोटा छापल्या जात होत्या. 1980 नंतर करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईला सुरुवात झाली. करन्सी नोटप्रेसमध्ये 5, 10, 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. वर्षाला सरासरी 4 हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात. त्यामुळे हे ठिकाणी सर्वच बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.

Share This News

Related Post

#ACCIDENT : कोल्हापुरात दोन दुचाकी स्वरांची समोरासमोर धडक; दोघांचाही मृत्यू

Posted by - February 14, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की…

अजितदादा… 17 ठिकाणं… 12 तासांत 31 उद्घाटनं ! (व्हिडिओ )

Posted by - March 12, 2022 0
पुणे- सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून काल शुक्रवारीच अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला मात्र या सगळ्या धावपळीत या…

मोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क हवाई हल्ला ? मुंबई पोलीस सतर्क…

Posted by - January 25, 2023 0
मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २६ जानेवारी रोजी शिवाजी पार्कवर परेड होणार आहे. 26 जानेवारीची ही विशेष परेड मुंबईकरांसाठी आकर्षणाचा…

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ‘ऐश्वर्य कट्ट्याचा’पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

Posted by - October 17, 2022 0
पुणे : प्रत्येक वेळी मान्यवरांच्या उपस्थितीने रंगणाऱ्या ऐश्वर्या कट्ट्यावर आज एक वेगळीच रौनक आलेली होती. उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून…

राज्यातील अवयवदानाचा टक्का वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

Posted by - March 17, 2022 0
राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी सर्वंकष अभ्यास करावा,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *