प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून मंजूर

354 0

मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. बोगस मजूर प्रकरणी दरेकरांना कोठडीची गरज नाही. माझ्या अशीलास मुद्दामपणे त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे, अशी प्रतिक्रिया दरेकरांच्या वकिलांनी दिली.

बोगस मजूर प्रकरणी दरेकर यांनी अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जमीन फेटाळला. आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे दरेकर यांना दिलासा मिळाला आहे. आवश्यकतेनुसार दरेकर तपास यंत्रणेसमोर हजर राहतील. तपासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे डोमेनवर उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यांच्या कोठडीची गरज नाही असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

दरेकर यांना ११ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. दरेकर यांच्याविरुद्ध एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी दरेकर यांना दुसऱ्यादा नोटीस बजावली होती. दरेकर हे मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहिले होते. या चौकशी दरम्यान त्याच्यावर दबाव असल्याने त्याच्याकडून ठोस माहिती मिळाली नव्हती. यामुळे पोलिसांनी त्यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

आम आदमी पार्टीच्यावतीने दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्‍याचा आरोप त्‍यांच्यावर करण्यात आला आहे. त्‍यानंतर दरेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर मुबई पोलिसांनी त्याच्या चौकशीला सुरूवात केली आहे.

Share This News

Related Post

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, या भेटीबाबत अमित शाहांचा शेलारांना फोन

Posted by - April 12, 2023 0
शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली.…

गिरवली बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विचारपूस

Posted by - September 29, 2022 0
पुणे : आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन…

नवनीत राणा यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी : राणा यांच्या वकिलाची मागणी

Posted by - May 2, 2022 0
मुंबई- नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र पाठवून नवनीत राणा यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी…

लाऊडस्पीकरवरून अजान हा मूलभूत अधिकार नाही, अलाहाबाद कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Posted by - May 6, 2022 0
नवी दिल्ली- धार्मिक स्थळांवरून भोंगे हटविण्याच्या मुद्द्यावरून उत्तरप्रदेश, महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर मोठ्या आवाजात…
Rain Update

Rain Update : पावसाने घेतली क्षणभर विश्रांती; मात्र ‘या’ दिवसापासून राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस

Posted by - August 1, 2023 0
पुणे : थैमान घालणाऱ्या पावसानं (Rain Update) आता काहीशी विश्रांती घेतल्यामुळं अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जुलै महिन्यात या पावसाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *