आसनसोल पोटनिवडणुकीत बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा होणार का बाबू मोशाय ?

88 0

कोलकाता- एकेकाळी भाजपमध्ये मंत्रिपद उपभोगलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवत आहेत. तीन राज्यांतील विधानसभेच्या चार जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आसनसोलमध्ये 12.77 टक्के तर बालीगंगे मतदारसंघात 8 टक्के मतदान झालं आहे.

भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या राजीनाम्यामुळे आसनसोल लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. तृणमूल काँग्रेसला यापूर्वी कधीही आसनसोलच्या जागेवर विजय मिळवता आलेला नाही. यंदा मात्र 2019 मध्ये भाजप सोडणारे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आसनसोल मतदारसंघातील बिगर बंगाली लोकांमध्ये प्रभाव पाडून विजय मिळवतील अशी तृणमूलला आशा आहे. सिन्हा यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल आहेत. भाजपने अनेक स्टार प्रचारकांसह आसनसोल मतदारसंघात जोरदार प्रचार केला आहे.

दरम्यान, भाजपने आसनसोल मतदारसंघात बाहेरच्या व्यक्तीला आणल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांच्यावर केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं की, ‘मी आता फक्त ‘बिहारी बाबू’ राहिलो नाहीत, तर आता ‘बंगाली बाबू’ही आहे.’ प्रचाराच्या भाषणातही त्यांनी अनेकदा बंगाली भाषेचा वापर केला.

Share This News

Related Post

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज संसदेत अमित शहा यांच्या कार्यालयात सात वाजता महत्त्वाची बैठक; दोन्हीही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

Posted by - December 14, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या मुद्द्यावर आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या…

सह्याद्रीच्या जंगलात तरुणाचा घोरपडीवर अनैसर्गिक अत्याचार, विकृतीचा कळस!

Posted by - April 7, 2022 0
कोल्हापूर – लैंगिक अत्याचाराच्या घटना आपल्या वाचनात येणे ही नित्याची बाब झाली आहे. पण एका विकृत तरुणाने चक्क घोरपडी सोबत…

पुणेकरांसाठी महत्त्वाचे! आता वाहतूक पोलीस दंड आकारणार नाहीत

Posted by - June 13, 2022 0
पुणे- वाहन चालवताना नियम मोडला की वाहतुक पोलीस लगेच दंड ठोठावतात. यामुळं कधी-कधी वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वादावादी देखील…

मदत व पुनर्वसन विभाग : राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरांमध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा

Posted by - February 27, 2023 0
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय…

दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूयात ‘नारळाचा चव आणि खव्यापासून सुरेख करंज्यांची रेसिपी

Posted by - October 13, 2022 0
दिवाळी फराळाला सुरुवात केलीत का? अनेक गृहिणींनी सामानाची जमवाजमा करायला सुरुवात नक्कीच केली असणार आहे. चला तर मग आज पाहूयात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *