प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशी होणार; गृहमंत्री वळसे-पाटील यांचे आदेश

758 0

मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख पुत्र आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा काल (शुक्रवार) मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रभाकर साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. पोलीस महासंचालकांना याबाबतचे आदेश दिले असल्याचे त्यांनी म्हटले.

“ही अतिशय अचानक घडलेली घटना आहे आणि यासंदर्भात निश्चितप्रकारे संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यासाठी मी आदेश दिलेले आहेत.” अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. एनसीबीने केलेल्या या कारवाईत प्रभाकर साईल हा पंच होता. एनसीबीच्या या कारवाईवरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. साईल हा एनसीबीच्या कारवाईत असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. एनसीबीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आरोप सुरू केल्यानंतर साईलने केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली होती.

एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांच्या मृत्यूबाबत चर्चा होत आहे. हा मृत्यू नसून घातपात असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर याबद्दल सीआयडी चौकशीची देखील मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यासंबंधी आदेश दिले आहेत.

प्रभाकर साईल यांचा मृत्यू काल त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती त्यांचे वकील वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

Crime

धक्कादायक! इंस्टाग्राम वर ची ओळख तरुणीला पडली महागात; गुंगीचे औषध टाकून वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार

Posted by - April 25, 2022 0
सध्या सोशल मीडियावर तरुण-तरुणीचे ऑनलाइन बोलण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.परंतु सोशल मीडीयाच्या माध्यमातून गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात…
Viral Video

Viral Video : संतापजनक ! लेकानं जन्मदात्या आईला रस्त्यावरून नेलं फरपटत

Posted by - August 29, 2023 0
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बागपत या ठिकाणी (Viral Video) माणुसकीला काळिमा फासणारी घटना घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने…
FIR

Pune News : RTO कार्यालयामधील राड्याप्रकरणी केशव क्षीरसागर, अजय मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - February 24, 2024 0
पुणे : पुणे (Pune News) आरटीओत तुंबळ हाणामारी करत, राडा घालणार्‍या टॅक्सी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात…

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याची होणार सुटका, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Posted by - May 18, 2022 0
चेन्नई- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एजी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ए.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *