पुणे : गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना घरगुती गणपतीचे विसर्जन सुरू झाले आहेत. गेल्या पाच दिवसात पुणे शहरात २७ हजार ३७५ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे.
यापैकी १६ हजार ७२५ गणेश मूर्ती या शहरात विविध ठिकाणी ठेवलेल्या लोखंडी टाक्यांमध्ये करण्यात आले आहे. गेल्यावर्षी पाचव्या दिवशी ५८ हजार ५९६ मूर्तींचे विसर्जन झाले होते, पण या तुलनेत यंदा पाचव्या दिवशी विसर्जन झाल्याचा आकडा ३० हजारापेक्षा कमी आहे.महापालिकेने विसर्जनासाठी ३०३ ठिकाणी व्यवस्था केली आहे.
तर १९१ मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य संकलन केंद्र २८०, फिरते हौद १५० अशी व्यवस्था केली आहे. दीड दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस आणि पाचवा दिवस असे आत्तापर्यंत २७ हजार ३७५ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले आहे. यापैकी १५ हजार ८३२ मूर्ती पाचव्या दिवशी झालेल्या आहेत.यंदा २७ हजार ३७५ मूर्तींपैकी ३ हजार ९१८ मूर्ती संकलन झाल्या आहेत. हे प्रमाण अवघे १४ टक्के इतके आहे.