धक्कादायक : पुण्यात 899 KG नकली पनीर जप्त ; एकूण 4 लाख किमतीचा साठा जप्त

319 0

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन नकली पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन साठा जप्त करण्यात आला.

या कारखान्यावर छापा टाकून १ लाख ९७ हजार ७८० रुपये किंमतीचे ८९९ किलो नकली पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीची ५४९ किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि ४ हजार ५४४ रुपये किंमतीचे २८.४ किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण ४ लाख २१ हजार ९२४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात असून घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.

सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

स्मृती ईराणी यांनी सोनिया गांधी अपमान केल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन’

Posted by - July 29, 2022 0
  पुणे:अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात काल संसदेमध्ये केंद्रिय मंत्री स्मृती ईराणी यांनी घोषणा देऊन अपमान…

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; वसंत मोरेंची घेतली भेट

Posted by - December 9, 2022 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये आज अमित ठाकरे यांनी वसंत…

अखेर लोणावळ्याच्या जंगलात हरवलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह आढळला

Posted by - May 24, 2022 0
लोणावळा- लोणावळ्याच्या घनदाट जंगलात ट्रेकिंगसाठी दिल्ली येथून आलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला. हा तरुण २० मे पासून बेपत्ता होता. एनडीआरएफ…
Karnataka Crime News

Karnataka Crime News : पत्नीच्या ‘त्या’ सवयीला वैतागून पतीने रागाच्या भरात उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - August 12, 2023 0
कर्नाटक : वृत्तसंस्था – कर्नाटकमधून (Karnataka Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Karnataka Crime News) एका व्यक्तीने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *