पुणे : पुण्यामध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, या पीएमपीएमएल बसने एका दुचाकी स्वारासह अनेक वाहनांना जोरदार धडक दिली आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून, या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतून हा अपघात किती भयावह होता याचा अंदाज येतो.
सिटी बसने दुचाकीस्वारासह अनेक वाहनांना उडवलं; भीषण अपघाताचा VIDEO समोर pic.twitter.com/E1r2jnQh1J
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) December 29, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असून, समोरून येणाऱ्या दोन दुचाकींसह टेम्पो, रिक्षा आणि एका 407 टेम्पो ट्रकला जोरदार धडक दिली. धडक बसल्यानंतर यातील दुचाकी स्वाराला बसने अक्षरशा अंदाजे तीनशे फूट खरपटत नेल आहे. या अपघातामध्येदुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तर कारला ठोकल्यामुळे या कारमधील महिला देखील जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे.