नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात, ट्रकला धडकल्यानंतर बस उलटली

136 0

नाशिक- मेडिकल कॉलेजच्या स्टाफला घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला जोरदार धडक बसून अपघात झाला. ट्रकला धडक दिल्यानंतर बस उलटली. या मध्ये 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले. ही घटना नाशिकमध्ये नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. मेडिकल कॉलेजच्या स्टाफला घेऊन ही बस निघाली होती. या बसमध्ये मेडिकल कॉलेजमधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचारी होते. बस आणि ट्रक यांच्यात समोरा समोर हा अपघात झाला. त्यानंतर बस उलटली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचासाठी खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अथर्वशीर्ष अभ्यासक्रम; हरी नरके, भुजबळांचा विरोध

Posted by - November 30, 2022 0
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्री गणेश अथर्वशीर्ष यावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात…

मुंबईतील रेल्वे अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Posted by - April 16, 2022 0
मुंबई- माटुंगा स्टेशनजवळ काल झालेल्या अपघातामुळे पुद्दुचेरी एक्स्प्रेसने गदग एक्स्प्रेसला धडक दिल्यानं पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील…

राज ठाकरेंच्या नातवाचं नामकरण ; काय ठेवलं नाव ? काय आहे नावाचा अर्थ ? वाचा…

Posted by - May 6, 2022 0
मुंबई- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आज या नव्या…
Gadchiroli News

Gadchiroli News : घातपात कि अपघात ? बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अचानक आढळला मृतदेह

Posted by - October 24, 2023 0
गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 22 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या एका 12 वर्षीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *