पुणे- येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्याचे छत कोसळल्यानं 5 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (ता.3) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे
या साईटवर रात्री उशिरा काम सुरू असताना ही घटना घडली. यावेळी एकूण 10 मजूर तिथं काम करत होते. त्यातील 5 जण या घटनेत मृत्युमुखी पडले असून उर्वरती 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या जवानांना स्लॅबखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कामगार स्लॅबच्या लोखंडी गजांखाली अडकले होते. त्यामुळे त्या कामगारांची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला करावा लागला.
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यातआले. सध्या मृतांची ओळख पटवण्याचा काम पोलीस प्रशासन करत आहे. हे सर्व कामगार परराज्यातील असल्याचं येरवडा पोलिसांनी सांगितलं. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फारुक वाडिया यांची ही जमीन असून अहलुवालिया यांची साईट असल्याची माहिती समोर आली आहे.
एवढ्या रात्री या साईटवर काम कसं काय चालू होतं ? या मॉलच्या बांधकाम वेळेस सुरक्षतेची योग्य ती जबाबदारी घेतली आहे का ? एवढ्या रात्री देखील काम सुरू करायला कुणी परवानगी दिली ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत.
दरम्यान संबधित घटनेवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत पुणे महानगरपालिकेच्या अग्नीशामक दलाकडून देवदूत पथकासह युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली.
येरवडा येथील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगल्याजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळून काही लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून आपल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. pic.twitter.com/H9DaUMQ1iV
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) February 3, 2022
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, पुण्यातील एका निर्माणाधीन इमारतीत दुर्घटनेने दुखावलो आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. मला आशा आहे की या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व लवकरात लवकर बरे होतील, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
Pained by the mishap at an under-construction building in Pune. Condolences to the bereaved families. I hope that all those injured in this mishap recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 4, 2022