नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा, बंगल्यावर तुर्तास कारवाई न करण्याचे आदेश

438 0

मुंबई- मुंबई हायकोर्टाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बंगल्याबाबत नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला होता. त्या विरोधात राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्यावर आज झालेल्या सुनावणीत राणेंच्या बंगल्यावर तुर्तास कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने मुंबई पालिकेला दिले आहे.

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं ‘अधीश’ नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेनं दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती. या नोटीशी विरुद्ध नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. राणेंच्यावतीनं जेष्ठ विधिज्ञ डॉ. मिलिंद साठे तर पालिकेच्यावतीनं जेष्ठ विधिज्ञ आस्पी चिनॉय यांनी युक्तिवाद केला. राणेंनी आपल्या ‘अधीश’ बंगल्यात अनेक ठिकाणी आराखड्याच्या विरूद्ध बांधकाम केल्याची माहिती यावेळी पालिकेनं दिली.

मात्र पालिकेनं बांधकाम नियमित करून घेण्याची संधीच दिली नाही, असा राणेंच्यावतीनं कोर्टात दावा करण्यात आला. मात्र राणेंच्या या दाव्यावर पालिकेनं आपला आक्षेप नोंदवला. एकिकडे याचिकेत दावा करायचा की बंगल्यात काहीही बेकायदेशीर बांधकाम नाही, मग बांधकाम नियमित करण्याचा प्रश्नच कुठे येतो?, असा सवाल पालिकेच्या वतीनं करण्यात आला.

मात्र इमारतीचं बाधकाम पूर्ण होऊन 9 वर्ष झाल्यानंतर आता ही नोटीस पाठवण्याचं कारण काय?, असा सवाल करत याचिकाकर्त्यांनी इथं आपल्या मुलभूत अधिकारांवर घाला घातला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच ही नोटीस शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेनं केवळ राजकीय सूडबुद्धीनं पाठवल्याचाही राणेंचा आरोप आहे. त्यावर हायकोर्टाने राणेंच्या बंगल्यावर तुर्तास कारवाई न करण्याचे आदेश मुंबई पालिकेला दिले आहे आहेत.

Share This News

Related Post

कांडका पडला! राजाराम सहकारी साखर कारखान्यात महाडिक गटाची दमदार एन्ट्री

Posted by - April 25, 2023 0
कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी सतेज…
Docudrama

Docudrama : डॉक्युड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच; ‘या’ नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावर

Posted by - March 4, 2024 0
अहेरी : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Docudrama) यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आत्राम यांचा राजकीय-सामाजिकपट उलगडणाऱ्या ‘धर्मरावबाबा…
Tejaswini Pandit

Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितने केले सूचक ट्विट

Posted by - February 7, 2024 0
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) अनेकवेळा सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसत…

मोठी बातमी : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मध्यस्थी; 14 डिसेंबरला होणार महत्त्वाची चर्चा

Posted by - December 9, 2022 0
नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न मोठ्या प्रमाणावर चिघळल्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतली.…
India Meet

India Meet : इंडिया आघाडीची समन्वयक समिती जाहीर; ‘या’ नेत्यांवर देण्यात आली जबाबदारी

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक (India Meet) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये (India Meet) देशभरातील विरोधी पक्षाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *