पिंपरी- बंगळुरू येथे २६ व २७ मार्च रोजी होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय ऐरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून हर्षद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता तिहेरी संघ परीजा क्षीरसागर, अनुष्का लुणावत व अनवी पाटील यांची,तर ११ वर्षाखालील वयोगटात सृष्टी खोडके हिची निवड झाली आहे. सध्या संघ स्पर्धापूर्व सरावासाठी शेगाव येथे दाखल झालेला असुन २४ ता. बंगळुरूकडे रवाना होणार आहे.