राणे पितापुत्रांना मालवणी पोलिसांचे समन्स, ‘या’ दिवशी हजर राहण्याचे आदेश

320 0

मुंबई- दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावले आहे. नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर तब्बल दोन वर्षांनंतर १९ फेब्रुवारीला नारायण राणे, त्याचे पुत्र नितेश राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये खळबळजनक आरोप करून नवा वाद निर्माण केला होता. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता. यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केली. या आरोपांमुळे सालियन कुटुंबीयांची बदनामी झाल्याचे लेखी तक्रारीमध्ये म्हटले होते. त्यानंतर
नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य महिला आयोगाने मालवणी पोलीस ठाण्याकडून दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल मागितला होता.

याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावलं आहे. नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Share This News

Related Post

नितीन गडकरी यांना धमकी देणारा जयेश पुजाराकडून मोबाईल आणि सीमकार्ड जप्त; नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले…

Posted by - March 24, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देणारा आरोपी जयेश पुजारी याच्याकडून धमकी देण्यात आलेला मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात…
Suicide News

Suicide News : सासूच्या टोमण्यांना वैतागून वर्षभरातचं विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - September 16, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना (Suicide News) घडली आहे. यामध्ये एका छोट्याशा कारणावरून एका विवाहितेने आपल्या आयुष्याचा शेवट केला…

#PUNE : चुकून टेम्पोचा रिव्हर्स गेअर पडला; तरुण थेट पडला 40 फूट खोल विहिरीत

Posted by - March 23, 2023 0
पुणे : पुण्यात कात्रज कोंढवा रोडवर बुधवारी सकाळी एक विचित्र घटना घडली आहे. वॉशिंग सेंटरवर टेम्पो घेऊन आल्यानंतर चालक टेम्पोच्या…
Maharashta Politics

Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण खूप खालच्या स्थरावर गेले…

हवामान विभाग : 122 वर्षांचा विक्रम मोडला ! फेब्रुवारीतच सरासरी तापमान 29.5 डिग्री , सांभाळा !

Posted by - March 1, 2023 0
महाराष्ट्र : महाराष्ट्र 2023 मध्ये फेब्रुवारी उलटत नाही तो पर्यंतच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागच्या वर्षी थंडी देखील कडाक्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *