पुणे- शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले. या घटनेत चारही तरुणांचा मृत्यू झाला चौघांचेही मृतदेह शोधण्यात पोलिस आणि अग्निशामक दलाला यश आलं आहे. ही घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील हॉटेल प्यासाजवळ घडली आहे.
सिकंदर पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा दत्ता जाधव, रुपेश कांबळे अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, लोणी काळभोर येथील हॉटेल प्यासाजवळ असलेल्या एका घराची शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी चार तरुण आले होते. सुरुवातील टाकीमध्ये 2 तरुण पडले, त्यानंतर इतर दोनजण टाकीत पडले. ही टाकी सुमारे 10 ते 12 फुट खोल होती. ही घटना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेत मदतकार्य सुरु केले. यामध्ये चारही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. सदरची करावे अग्निशमन केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक माने नितीन, विकास पालवे, अभिजित दराडे उमेश फाळके, मुस्तक तडवी, मयूर गोसावी, चेतन खमसे, प्रशांत अडसूळ, ओम पाटील, अक्षय नेवसे यांनी केली.