आयएनएस विक्रांत बचाव निधीप्रकरण, सोमय्या पिता-पुत्र पोलीस चौकशीला गैरहजर

969 0

मुंबई- आय एन एस विक्रांत या युद्धनौका निधी प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉमबे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पोलीस ठाण्यात हजर होता येणार नाही अशी माहिती सोमय्या यांच्या वकिलांनी दिली आहे.

आय एन एस विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपयांचा निधी गोळा केला. मात्र, हा निधी सोमय्या यांनी राजभवनात जमा केलेला नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉमबे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र दोघेही गैरहजर राहिले.

सोमय्या यांच्या वकिलांनी माहिती दिली की, ‘आम्हांला एफआयआरची प्रत आज मिळाली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज किरीट सोमय्या दिल्लीत आहेत. नील सोमय्या यांचेही ठरलेले कार्यक्रम आहेत. त्यामुळे आज किरीट सोमय्या आणि नील सोमय्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पत्रं दिलं आहे. 13 एप्रिलनंतर कधीही सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहतील.’

यासंदर्भात किरीट सोमय्या म्हणाले होते की, आधी 58 कोटी रुपये गोळा केल्याचा पुरावा द्या, मी तर फक्त प्रतिकात्मक आंदोलन केलं. 35 मिनिटांत इतकी रक्कम कशी काय जमा होऊ शकते असा सवालही त्यांनी केला.

Share This News

Related Post

दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होणार ! झूम कॉलच्या माध्यमातून बोर्डाच्या परीक्षांवर वॉच !

Posted by - January 16, 2023 0
दहावी बारावी विद्यार्थ्यांचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केल आहे. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून राज्यातील 9 हजार केंद्रांवर मोबाइल कॅमेऱ्यांचा वॉच असणार…

‘स्त्रीभ्रूण हत्त्यांचा जिल्हा’ अशी ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात एका दाम्पत्याकडून मुलीच्या जन्माचं स्वागत

Posted by - November 18, 2022 0
बीड : जो बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी बदनाम झाला होता. त्याच बीड जिल्ह्यात एका दाम्पत्यांनं कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून तिचं…

महत्वाचे निर्णय : चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाहतूक समस्येची पाहणी

Posted by - August 27, 2022 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या, वाहतूक कोंडीची…
Pune Police

Pune Police : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय ! सर्व राजकीय नेत्यांच्या…

Posted by - March 19, 2024 0
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी (Pune Police) जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात कोणतंही गैरकृत्य होणार नाही…

मोठी बातमी : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला; हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू

Posted by - March 3, 2023 0
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर चार अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकला बाहेर पडले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *