प्रियकराने लग्नास दिला नकार ! प्रेयसीसह तिच्या 5 मैत्रिणींचा आत्महत्येचा प्रयत्न, तिघींचा मृत्यू

653 0

पाटणा- एका युवतीचं एका तरुणावर प्रेम जडलं. तरुणीने आपलं प्रेम व्यक्त करत त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तरुणाने लग्नास नकार दिला. यामुळे निराश झालेल्या तरुणीने घरी येऊन विषारी पदार्थ खाल्ला. जेव्हा या तरुणीच्या पाच मैत्रिणी घरी पोहोचल्या तेव्हा तरुणीची ही अवस्था पाहून त्यांनीही विष प्राशन केलं. या घटनेत तीन तरुणींचा मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमधील एका तरुणीचे तिच्या भावाच्या मेहुण्यासोबत प्रेमसंबंध होते. तिने आपल्या मैत्रिणींसमोर आपलं प्रेम व्यक्त करत त्याला लग्नासाठी विचारणा केली, मात्र त्याने लग्नास नकार दिला. प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर सगळ्या मैत्रिणी गावी आल्या. नंतर त्यांनी पाहिलं की त्यांच्या मैत्रिणीने विष प्राशन केलं आहे. हे पाहून इतर मैत्रिणींनीही तिची साथ दिली आणि या सगळ्यांनी विष प्राशन केलं.

औरंगाबाद जिल्ह्यातील कसमा पोलीस स्टेशन हद्दीतील चिरैला गावात हा भयानक प्रकार घडला. या घटनेत ३ जणींचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर मगध वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सगळ्या मैत्रिणी गुरारू येथे गेल्या होत्या आणि तिथून आल्यानंतर त्यांनी विष प्राशन केलं. तीन मुलींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

Share This News

Related Post

मागील वर्ष ठरले रा. स्व. संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष – नाना जाधव

Posted by - March 15, 2023 0
पुणे : मागील वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अधिक जोमाने…

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप ; राहुल गांधी म्हणतात , “प्रवासातून मी खूप काही शिकलो…!”

Posted by - January 30, 2023 0
श्रीनगर : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये समारोप होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील या यात्रेसाठी आज अनेक…
Ajit Pawar

Ajit Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?

Posted by - July 2, 2023 0
मुंबई- आज सकाळपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती. अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराची…

अनिल देशमुख, सचिन वाझे यांच्यासह देशमुखांचे दोन सचिव सीबीआयच्या ताब्यात

Posted by - April 4, 2022 0
मुंबई- मनी लॉन्ड्रिग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख , त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *